• 'आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनेमार्फत (International Maritime Organization - IMO)' दरवर्षी २५ जून रोजी 'खलाशी दिन (Day of the Seafarer)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • समुद्री जहाज तसेच खलाशांची दखल घेण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • २०२१ सालचा हा या दिवसाचा ११ वा वर्धापन दिन आहे.

  • 'खलाशी: शिपिंगच्या भविष्यातील गाभ्यात (Seafarers: at the core of shipping’s future)' ही २०२१ सालच्या 'खलाशी दिना'ची थीम आहे.

  • सदर दिवस २०११ पासून साजरा केला जात आहे.