• तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारतात दरवर्षी २५ जानेवारी रोजी 'राष्ट्रीय मतदार दिवस (National Voters’ Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • 'आपले मतदार सक्षम, जागरुक, सुरक्षित बनविणे आणि माहितीपूर्ण करणे (Making Our Voters Empowered, Vigilant, Safe and Informed)’ ही २०२१ सालच्या यंदाच्या ११ व्या राष्ट्रीय मतदार दिवसाची थीम आहे.

  • २५ जानेवारी १९५० या भारतीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India - ECI) स्थापना दिनानिमित्त २५ जानेवारी २०११ पासून सदर दिवस साजरा करण्यात येत आहे.

ECI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ECI म्हणजेच Election Commission of India अर्थात भारतीय निवडणूक आयोग होय.

  • मुख्य निवडणूक आयुक्त: सुनील अरोरा हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • स्थापना वर्ष: २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.