• भारतात दरवर्षी २५ डिसेंबर रोजी 'सुशासन दिन (Good Governance Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवशी भारतात माजी पंतप्रधान भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात येते.

  • सरकारमधील उत्तरदायित्वाबाबत भारतीय जनतेमध्ये जागरूकता वाढवून पंतप्रधान वाजपेयींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने २०१४ मध्ये या सुशासन दिनाची स्थापना करण्यात आली होती.

अटलबिहारी वाजपेयी यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अटलबिहारी वाजपेयी यांनी ३ वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून काम पहिले आहे.

  • १९९६ मध्ये त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ १३ दिवसांचा होता.

  • मार्च १९९८ ते एप्रिल १९९९ या कालावधीत त्यांचा १३ महिने कालावधीचा दुसरा कार्यकाळ होता.

  • १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी पदाचा संपूर्ण कालावधी पूर्ण केला.

  • १९६२ मध्ये संसदेत त्यांचा पहिला प्रवेश राज्यसभेच्या माध्यमातून झाला होता.

  • वाजपेयी ७ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.

  • २०१५ मध्ये वाजपेयी यांना 'भारतरत्न' हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.