-
यंदाचा २०२० सालाचा जागतिक जल सप्ताह हा २४ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२० या कालावधी दरम्यान जागतिक गृह जल सप्ताह (World Water Week at Home - WWWeek at Home) म्हणून पाळण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
‘पाणी आणि हवामान बदल: प्रवेगक कृती (Water and Climate change: Accelerating Action)’ या थीम अंतर्गत हा सप्ताह साजरा करण्यात आला आहे.
-
हा सप्ताह म्हणजे ग्रहावरील पाण्याचे प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय विकासाबाबतच्या संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १९९१ सालापासून स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय जल संस्थेद्वारे (Stockholm International Water Institute - SIWI) आयोजित एक वार्षिक जागतिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे.
SIWI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: SIWI म्हणजेच Stockholm International Water Institute अर्थात स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय जल संस्था होय.
-
कार्यकारी संचालक: SIWI च्या कार्यकारी संचालक पदावर टॉर्ग्नी होल्मग्रेन हे सध्या कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: स्टॉकहोम, स्वीडन या ठिकाणी SIWI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
विशेष लक्ष केंद्रित क्षेत्र: शाश्वत जल व्यवस्थापन हे SIWI चे विशेष लक्ष केंद्रित क्षेत्र आहे.