• पोलिओ लसीकरण आणि पोलिओ निर्मूलनासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी 'जागतिक पोलिओ दिन (World Polio Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिन पोलिओमुक्त जगाच्या दिशेने होणाऱ्या जागतिक पातळीवरील प्रयत्नांना उजाळा देण्याची आणि पोलिओ निर्मूलनाच्या लढाईतील आघाडीच्या लोकांच्या अथक योगदानाचा सन्मान करण्याची संधी प्रदान करतो.

  • जॉनस साल्कच्या स्मरणार्थ रोटरी इंटरनॅशनलमार्फत (Rotary International) या दिवसाची स्थापना करण्यात आली होती.

  • जॉनस साल्क याने पोलिओमायलाईटिसविरूद्ध (poliomyelitis) लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पहिल्या गटाचे नेतृत्व केले होते.

  • 'पोलिओविरूद्धचा विजय हा जागतिक आरोग्यासाठी एक विजय आहे (A win against polio is a win for global health)' ही २०२० च्या जागतिक पोलिओ दिनाची थीम आहे