-
संयुक्त राष्ट्रांचा ‘जागतिक विकास माहिती दिन (World Development Information Day)’ दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
जागतिक विकासाबाबतच्या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि सर्वांगीण विकासाच्या उद्देशपूर्तीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याची आवश्यकता दर्शविणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
जागतिक विकास माहिती दिनाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
विकासमार्गावरील समस्यांकडे जगाचे लक्ष वेधून निराकरण करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याची गरज निर्माण करण्यासाठी १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत जागतिक विकास माहिती दिन स्थापन करण्यात आला होता.
-
संयुक्त राष्ट्रांच्या स्थापना दिनासोबत अर्थात २४ ऑक्टोबरसोबत हा दिवस साजरा करण्यात यावा असे आमसभेमार्फत ठरवण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.