• १९४८ पासून दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी 'संयुक्त राष्ट्र दिन (United Nations Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • शांतता, विकास प्रस्थापित करण्यासाठी आणि सर्वांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना करण्यात आली होती.

  • सुरक्षा परिषदेच्या ५ स्थायी सदस्यांसह स्वाक्षर्‍या करून UN चार्टरच्या मंजुरीनंतर संयुक्त राष्ट्रे अधिकृतपणे अस्तित्वात आली होती.

  • सन २०२० हे संयुक्त राष्ट्रांचा ७५ वा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.