• भारतामध्ये 'राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day - NGCD)' दरवर्षी २४ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • मुलींबाबतच्या असमानतेवर लक्ष केंद्रित करणे, मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि पोषण या घटकांसाठी प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जनजागृती करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • महिला व बालविकास मंत्रालय आणि भारत सरकारच्या पुढाकाराने पहिल्यांदा २००८ मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला होता.