• 'केंद्रीय उत्पादन शुल्क दिन (Central Excise Day)' दरवर्षी २४ फेब्रुवारी रोजी भारतभर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टमच्या (Central Board of Excise and Custom - CBEC) देशाप्रती असणाऱ्या सेवेचा सन्मान करण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • अधिकाऱ्यांना आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सदर दिवसाचे आयोजन करण्यात येते.

CBEC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: CBEC म्हणजेच Central Board of Excise and Custom अर्थात केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टम मंडळ होय.

  • अध्यक्ष: एम. अजित कुमार हे सध्या CBEC च्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत..

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे CBEC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: २६ जानेवारी १९४४ रोजी CBEC ची स्थापना करण्यात आली होती.

  • ब्रीदवाक्य: 'देशसेवार्थ करसंचय' हे CBEC चे ब्रीदवाक्य आहे.