• भारतीय विमानतळ प्राधिकरणमार्फत (Airports Authority of India - AAI) २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत विमान वाहतूक सुरक्षा जागरूकता सप्ताह (Aviation Safety Awareness Week) २०२० साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • संपूर्ण भारतभर AAI मार्फत व्यवस्थापित सर्व विमानतळे आणि इतर ठिकाणी आठवडाभर हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

  • विमानतळ संचालकांमार्फत शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये हवाई वाहतूक सुरक्षेबाबत स्थानिक रहिवाशांच्या भूमिकेबद्दल जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

AAI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: AAI म्हणजेच Airports Authority of India अर्थात भारतीय विमानतळ प्राधिकरण होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे AAI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १ एप्रिल १९९५ रोजी AAI ची स्थापना करण्यात आली होती.

  • अध्यक्ष: अरविंद सिंग हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.