संपूर्ण भारतात दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय अंतराळ दिन (National Space Day - NSpD)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organization - ISRO) 'चांद्रयान-३' मोहिमेचे ऐतिहासिक यश आणि 'प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover)'चे यशस्वी प्रक्षेपण व कार्यान्वितीकरण यांच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतात २३ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय अंतराळ दिन' (NSpD) साजरा केला जातो.
  • राष्ट्रीय अंतराळ दिन २०२६ ची संकल्पना (थीम): 'विकसित भारताच्या दिशेने: नाविन्य, सहकार्य आणि जागतिक अंतराळ नेतृत्वाचे ध्येय' ही यंदाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • भारत सरकारमार्फत ऑगस्ट २०२३ मध्ये 'चांद्रयान-३' मोहिमेच्या यशाचे स्मरण म्हणून दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे इस्रोच्या टीमसोबत घेतलेल्या बैठकीदरम्यान ही घोषणा केली होती.
  • पहिल्यांदा 'राष्ट्रीय अंतराळ दिन' २०२४ मध्ये साजरा करण्यात आला होता.

ISRO बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): ISRO म्हणजेच Indian Space Research Organization अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.
  • स्थापना वर्ष: भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक येथे ISRO चे मुख्यालय स्थित आहे.
  • ध्येयवाक्य (Motto): 'मानवजातीच्या सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान (Space technology in the service of humankind)' हे ISRO चे ध्येयवाक्य आहे.
  • प्रमुख प्रक्षेपण केंद्र: सतीश धवन अंतराळ केंद्र (Satish Dhawan Space Centre - SDSC), श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश हे ISRO चे प्रमुख प्रक्षेपण केंद्र आहे.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या व्ही. नारायणन हे ISRO च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.