संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी 'गुलामगिरी व्यापार आणि त्याचे निर्मूलन यांच्या स्मृतीस वाहिलेला आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Remembrance of the Slave Trade and its Abolition)' पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- अटलांटिक महासागरापलीकडील गुलामगिरी व्यापाराचा फटका बसलेल्या लाखो लोकांच्या स्मृतीस उजाळा देणे आणि गुलामगिरीविरुद्धच्या संघर्षाची दखल घेणे या मुख्य उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी हा पाळला जातो.
दिवसाची पार्श्वभूमी:
- युनेस्कोच्या (United Nations Educational, Scientific and Cultural Organization - UNESCO) २९ व्या सर्वसाधारण परिषदेने ठराव स्वीकारून २३ ऑगस्ट हा दिवस 'गुलामगिरी व्यापार आणि त्याचे निर्मूलन यांच्या स्मृतीस वाहिलेला आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून घोषित करण्यात आला होता.
- २२-२३ ऑगस्ट १७९१ च्या रात्री सेंट-डोमिंग्यू जे सध्याचे हैती आहे - येथे सुरू झालेल्या उठावाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
- हैतीयन क्रांतीमधील एक निर्णायक वळण म्हणून या उठावाकडे पाहिले जाते ज्यामुळे अटलांटिक महासागरापलीकडील गुलामगिरी व्यापार नष्ट करण्यास हातभार लावला गेला होता.
- २३ ऑगस्ट १९९८ रोजी सर्वप्रथम हैतीमध्ये हा दिवस पाळला गेला.
- या दिवसाचे आयोजन युनेस्कोद्वारे करण्यात येते.
- गुलामगिरीचा इतिहास आणि त्याचे परिणाम यांबाबत जागरूकता निर्माण करणे, गुलामगिरी व्यापाराविरुद्धच्या संघर्षाची दखल घेणे आणि असमानता व भेदभावासह गुलामगिरीच्या दीर्घकालीन परिणामांवर चिंतन करण्यास प्रोत्साहन देण्याचे कार्य या दिवसाच्या माध्यमातून होते.
UNESCO बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना होय.
- स्थापना वर्ष: १६ नोव्हेंबर १९४५ रोजी UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे UNESCO चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या UNESCO चे १९४ सदस्य आणि १२ सहयोगी सदस्य देश आहेत.
- सध्या कार्यरत महासंचालक: खालेद एल-एनी हे सध्या UNESCO च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.