-
दरवर्षी जागतिक गेंडा दिवस हा जागतिक वन्यजीव निधी (World Wildlife Fund - WWF) तसेच इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे २२ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा आशिया आणि आफ्रिकेत वास्तव्य करणार्या गेंड्यांच्या ५ प्रजातींना होणार्या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात येतो. या ५ गेंड्यांच्या प्रजातींची दखल घेण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
-
जागतिक वन्यजीव निधी दक्षिण आफ्रिकामार्फत २०१० मध्ये पहिला जागतिक गेंडा दिन जाहीर करण्यात आला होता.
-
'पाच कायम स्वरूपी गेंडा प्रजाती (Five Rhino Species Forever)' या थीम अंतर्गत जागतिक गेंडा दिन २०२० साजरा केला जात आहे.