-
महान भरातीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त २०१२ सालापासून दरवर्षी २२ डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय गणित दिवस (National Mathematics Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
२०२० सालाची रामानुजन यांची १३३ वी जयंती साजरी केली जात आहे.
-
रामानुजन यांच्याकडे २० व्या तसेच २१ शतकातील गणिताचे रूपांतर आणि स्वरूप बदलण्याची अफाट कल्पनाशक्ती होती.
-
लोकांना गणिताच्या विकासाविषयी तसेच मानवतेच्या वाढीतील त्याच्या महत्वाबाबत जागरूक करणे हे राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय गणित दिनाचा इतिहास
-
२०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग यांच्यामार्फत भारतीय गणितातील अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या १२५ व्या वर्धापन दिनानिमित्त या दिवसाची घोषणा करण्यात आली होती.
-
२०१२ हे वर्ष 'राष्ट्रीय गणित वर्ष (National Mathematics Year)' म्हणूनही पाळण्यात आले होते.