-
दरवर्षी श्रावणपौर्णिमेला साजरा करण्यात येणारा 'जागतिक संस्कृत दिन (World Sanskrit Day)' २०२१ साली २२ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे
-
हिंदू दिनदर्शिकेमध्ये श्रावण महिन्याच्या पौर्णिमा दिवसाला 'रक्षाबंधन' म्हणून देखील ओळखले जाते.
-
प्राचीन भारतीय संस्कृत भाषेचे स्मरण करताना तिचे पुनरुज्जीवन करण्याला प्रोत्साहन देणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
१९६९ मध्ये पहिल्यांदा 'जागतिक संस्कृत दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.