-
दरवर्षी २२ एप्रिल रोजी 'आंतरराष्ट्रीय पृथ्वी माता दिन (International Mother Earth Day)' जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
पृथ्वीच्या आरोग्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षणाचे समर्थन करण्यास लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी सदर दिवस जगभर साजरा केला जातो.
-
सन १९७० मध्ये प्रारंभ झाल्यापासून यंदाचा २०२१ चा ५१ वा वर्धापन दिन आहे.
-
'आपली पृथ्वी पुनर्संचयित करणे (Restore Our Earth)' ही २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिनाची थीम आहे.
UNEP बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNEP म्हणजेच United Nations Environment Programme अर्थात संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नैरोबी, केनिया हे UNEP च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
कार्यकारी संचालक: इनगर अँडरसन सध्या UNEP च्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: ५ जून १९७२ मध्ये UNEP ची स्थापना करण्यात आली होती.