• 'आंतरराष्ट्रीय शांतता दिन (International Day of Peace)' दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • संयुक्त राष्ट्र आमसभेतर्फे २४ तास अहिंसा आणि युद्धबंदी पाळून शांततेचे आदर्श बळकट करण्यासाठी समर्पित करावयाचा दिवस म्हणून या दिवसाची निवड केली आहे.

  • 'समान आणि शाश्वत जगासाठी उत्तम पुनर्प्राप्ती करणे (Recovering Better for an Equitable and Sustainable World)' ही यंदाच्या २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय शांतता दिनाची थीम आहे.

  • १९८१ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत या दिवसाची स्थापना करण्यात आली होती.