• जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो. वृद्ध लोकांना उतारवयात सहन कराव्या लागणाऱ्या आणि त्यांच्या स्वास्थ्यावर विपरित परिणाम होणाऱ्या समस्यांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

ठळक मुद्दे

  • वृद्धांना होणाऱ्या समस्यांमध्ये वय कमी होणे, वृद्धांचा गैरवापर करणे अशा व यांसारख्या कित्येक बाबींचा समावेश होतो.

  • ज्येष्ठांचे समर्थन करणे, त्यांना योग्य तो सन्मान देणे आणि त्यांचे कौतुक करणे इ. बाबींवर लक्ष केंद्रित करणे अगत्याचे आहे.

  • जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वृद्ध व्यक्तींच्या समाजातील योगदानाची दखल घेण्याची आणि त्याची पोचपावती देण्याची कृती संपन्न होते.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • दिवसाची घोषणा: संयुक्त राष्ट्र आमसभेकडून १४ डिसेंबर १९९० रोजी सदर दिवसाची घोषणा करण्यात आली होती.

  • दिवसाची अधिकृत स्थापना: वृद्ध प्रौढांसाठी आणि त्यांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी एक दिवस समर्पित करण्याच्या उद्देशपूर्तीकरिता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी १९८८ मध्ये या दिवसाची अधिकृत स्थापना केली होती.