-
आंतरराष्ट्रीय शांतता दिन (International Day of Peace) दर वर्षी २१ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत (UN General Assembly) अहिंसा व संघर्षविराम पाळण्याच्या माध्यमातून शांततेचे आदर्श बळकट करण्यासाठी हा दिवस घोषित करण्यात आला होता.
-
'शांततेला एकत्रित आकार देणे (Shaping Peace Together)' ही आंतरराष्ट्रीय शांतता दिन २०२० साठीची थीम आहे.
-
सदर दिवसाची स्थापना १९८१ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत करण्यात आली होती.
संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सदस्यता प्राप्त देश: सध्या संयुक्त राष्ट्रांमध्ये १९३ सदस्य देश तर २ निरीक्षक देश आहेत.