• दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी 'जागतिक दूरदर्शन दिन (World Television Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • प्रसार माध्यमांच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • सदर दिवशी माध्यमांशी संबंधित पत्रकार, लेखक तसेच संप्रेषण आणि जागतिकीकरणात दूरदर्शनच्या भूमिकेस प्रोत्साहित करणाऱ्या इतर घटकांची उपयुक्तता सन्मानित करण्यात येते.

  • पहिला जागतिक दूरदर्शन मंच (World Television Forum) १९९६ मध्ये आयोजित करण्यात आला होता.

  • या घटनेचे औचित्य साधून संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत डिसेंबर १९९६ मध्ये सदर दिवसाची घोषणा करण्यात आली होती.