• दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी मासेमारी करणाऱ्या समुदायांद्वारे 'जागतिक मत्स्यपालन दिन (World Fisheries Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस महासागर परिसंस्थेचे तसेच जगभरातील मत्स्यपालनांचा शाश्वत साठा सुनिश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.

  • २०२० सालचा हा चौथा जागतिक मत्स्यपालन दिन आहे.

  • जागतिक मत्स्यपालन दिनाच्या निमित्ताने मानवी जीवनाचे तसेच पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यास मदत होते.

  • जगभरात मासेमारी करणारे समुदाय कार्यशाळा, सार्वजनिक सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, संगीत कार्यक्रम इ. द्वारे हा दिवस साजरा करतात.