• 'संवाद आणि विकासासाठीचा जागतिक सांस्कृतिक विविधता दिन (World Day for Cultural Diversity for Dialogue and Development)' दरवर्षी २१ मे रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगाच्या पाठीवरील विविध संस्कृतींची समृद्धी साजरी करणे हे या दिवसाचे मुख्य तत्व आहे.

  • शांतता आणि शाश्वत विकास साधण्यासाठी सकारात्मक बदलांचा समावेश म्हणून त्यांच्या विविधतेचे महत्त्व अधोरेखित करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे.

  • युनेस्कोमार्फत २००१ मध्ये ‘सांस्कृतिक विविधतेवरील सार्वत्रिक घोषणा (Universal Declaration on Cultural Diversity)’ स्विकारण्यात आली होती.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.