• भारतामध्ये 'राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन (National Anti Terrorism Day)' हा २१ मे रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • शांतता, सुसंवाद आणि मानवजातीचा संदेश देण्यासाठी तसेच लोकांमध्ये ऐक्य वाढविण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते.

  • देशाचे ६ वे पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द १९८४ ते १९८९ पर्यंत होती.