• भारताच्या शिफारसीनुसार 'आंतरराष्ट्रीय चहा दिन (International Tea Day)' २१ मे रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • चहा उत्पादक आणि चहा कामगारांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

  • जगभरातील चहाच्या सखोल सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्वविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच उपासमार आणि दारिद्र्य यांविरूद्ध लढा देण्यासाठी त्याचे महत्त्व वाढविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या अन्न व कृषी संघटनेमार्फत (Food and Agriculture Organization - FAO) आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्यात मान्यता दिली आहे.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.