• दरवर्षी २१ मार्च रोजी 'जागतिक कविता दिन (World Poetry Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगातील कविता वाचन, लेखन, प्रकाशन आणि शिकवण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • सदर दिवस मानवतेच्या सांस्कृतिक आणि भाषिक अभिव्यक्तीचा सर्वात मौल्यवान प्रकार म्हणून प्रसिद्ध आहे.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.