• दरवर्षी २१ जून रोजी 'जागतिक जलविज्ञान दिन (World Hydrography Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • लोकांच्या जीवनात जलविज्ञानाच्या भूमिकेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • 'आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संघटनेच्या (International Hydrographic Organization - IHO)' कार्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'जलविज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याची १०० वर्षे (One hundred years of international cooperation in hydrography)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक जलविज्ञान दिनाची थीम आहे.

  • संयुक्त राष्ट्र संघ आमसभेमार्फत २००५ मध्ये सदर ठराव मान्य करण्यात आला होता.