• 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (International Mother Language Day - IMLD)' दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • भाषिक तसेच सांस्कृतिक विविधतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'शिक्षण आणि समाज समावेशनासाठी बहुभाषिकांना प्रोत्साहन देणे (Fostering multilingualism for inclusion in education and society)' ही यंदाच्या २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची थीम आहे.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.