-
संयुक्त राष्ट्रसंघामार्फत दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी 'दहशतवाद पिडीतांचाआंतरराष्ट्रीय स्मरण आणि श्रद्धांजली दिन (International Day of Remembrance and Tribute to the Victims of Terrorism)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
दहशतवादी हल्ल्यांचे बळी ठरलेल्या लोकांच्या स्मरणार्थ सदर दिवस साजरा केला जातो.
-
२०१७ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत सदर दिवस नियुक्त करण्यात आल्यानंतर २०१८ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.