• केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांच्यामार्फत नुकतीच EASE 3.0 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • 'स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India - SBI)' सदर निर्देशांक पुरस्कारातील एकंदर विजेती ठरली आहे.

  • बँक ऑफ बडोदा दुसऱ्या तसेच युनियन बँक ऑफ इंडिया तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाल्या आहेत.

थीमनुसार पुरस्कार विजेते

  • महत्वाकांक्षी भारतासाठी स्मार्ट कर्ज (Smart Lending for Aspiring India): बँक ऑफ बडोदा

  • तंत्रज्ञान-सक्षम बँकिंग सुलभता (Tech-enabled ease of Banking): State Bank of India (SBI)

  • संस्थात्मक विवेकी बँकिंग (Institutionalised Prudent Banking): बँक ऑफ बडोदा

  • शासन आणि परिणाम केंद्रित मानव संसाधन (Governance and Outcome centric HR): युनियन बँक ऑफ इंडिया

  • FI आणि ग्राहक संरक्षण सखोल करणे (Deepening FI and Customer Protection): युनियन बँक ऑफ इंडिया