-
भारतीय चित्रपट, दूरदर्शन, संगीत आणि OTT मधील सर्वोत्कृष्ट कलाकृतींचा सन्मान करण्यासाठीचे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (Dadasaheb Phalke International Film Festival Awards) २०२१ जाहीर करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याला 'दिल बेचारा' चित्रपटातील अभिनयाबद्दल मरणोत्तर ‘क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता (Critics Best Actor)’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पुरस्कार विजेत्यांची यादी
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: दीपिका पदुकोण (छपाक)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता: अक्षय कुमार (लक्ष्मी)
-
क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: कियारा अडवाणी (गिल्टी)
-
क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता: सुशांतसिंग राजपूत (मरणोत्तर) (दिल बेचारा)
-
सर्वोत्कृष्ट चित्रपट: तान्हाजी: द अनसंग वॉरियर
-
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म: पॅरासाईट
-
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेता: के के मेनन
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: अनुराग बासू (लुडो)
-
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: विक्रांत मेस्सी (छपाक)
-
सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: राधिका मदन (अंग्रेजी मेडीयम)
-
विनोदी भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: कुणाल खेमू (लूटकेस)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता (वेब सिरीज): बॉबी देओल (आश्रम)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (वेब सिरीज): सुष्मिता सेन (आर्या)
-
सर्वोत्कृष्ट वेब सिरीज: स्कॅम १९९२
-
वर्षातील सर्वोत्कृष्ट अल्बम: तितलियाँ
-
सर्वोत्कृष्ट दूरदर्शन मालिका: कुंडली भाग्य
-
वर्षातील सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर: डब्बू रत्नानी
-
स्टाईल दिवा ऑफ द इयर: दिव्या खोसला कुमार
-
दूरदर्शन मालिकांमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: सुरभी चंदना
-
दूरदर्शन मालिकांमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता: धीरज धूपर
-
वर्षातील सर्वोत्कृष्ट परफॉर्मर: नोरा फतेही
-
चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान: धर्मेंद्र
-
भारतीय चित्रपटसृष्टीतील साहित्यातील उत्कृष्ट योगदान: चेतन भगत