-
चांगल्या आरोग्य तसेच कल्याणासाठी प्रोत्साहन देण्याच्या कार्यासाठी बांगलादेशच्या फैरुझ फैजा बीथरला 'बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनमार्फत (Bill and Melinda Gates Foundation)' २०२१ चेंजमेकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
वैयक्तिक अनुभवाचा वापर करून किंवा नेतृत्वाच्या पदाच्या वापरावरून बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीला सदर पुरस्कार बहाल करण्यात येतो.
-
सदर पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास ध्येय (Sustainable Development Goals - SDGs) साध्य करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे.
-
हा पुरस्कार म्हणजे बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे स्थापन केलेल्या 'गोलकीपर ग्लोबल गोल्स पुरस्काराचा (Goalkeepers Global Goals Award)' एक भाग आहे.