• 'संयुक्त राष्ट्र परिसंस्था पुनर्संचयनावरील दशक (United Nations Decade on Ecosystem Restoration)' हे २०२१-२०३० या कालावधीसाठी अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UN Environment Programme - UNEP) आणि संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेच्या (Food and Agriculture Organization of the UN - FAO) संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे कामकाज पाहण्यात येणार आहे.

  • २०१९ च्या ठरावामध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत याची घोषणा करण्यात आली होती.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.