-
११ वी QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी (World University Rankings) २०२१ नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
अमेरिकेतील मॅसचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (Massachusetts Institute of Technology - MIT) सलग ९ व्या वर्षी सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून आपले अव्वल स्थान अबाधित ठेवले आहे.
भारतीय विद्यापीठे क्रमवारी
-
भारतातील कोणतीही संस्था पहिल्या १०० मध्ये नाही.
-
भारतीय तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Technology - IIT), बॉम्बे ही १७२ व्या स्थानावर विराजमान झाली आहे.
-
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (१८५), भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली (१९५) ही क्रमवारीतील भारतातील इतर विद्यापीठे आहेत ज्यांनी पहिल्या २०० मध्ये स्थान मिळवले आहे.