-
स्वच्छ सर्वेक्षण २०२० पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सलग चौथ्या वर्षी इंदौर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनले आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडून गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय राजधानीतील ‘स्वच्छ महोत्सव’ पुरस्कार वितरण सोहळ्यात स्वच्छ सर्वेक्षण-२०२० चा निकाल जाहीर करण्यात आला.
ठळक मुद्दे
-
देशाच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणांची ही एकूण ५ वी आवृत्ती आहे.
-
अव्वल कामगिरी करणारी शहरे व राज्यांना एकूण १२९ पुरस्कार देण्यात येणार आहेत.
-
स्वच्छ सर्वेक्षण २०१६ मध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरू केले होते.
-
म्हैसूरने २०१६ मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहरासाठी पुरस्कार जिंकला होता.
-
२०१७, २०१८ आणि २०१९ सालांमध्ये इंदौरने सलग ३ वर्षे अव्वल स्थान कायम राखले आहे.
पुरस्कारांची संपूर्ण यादी
१ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी 'स्वच्छ शहर पुरस्कार'
-
इंदौर (मध्य प्रदेश)
-
सुरत (गुजरात)
-
नवी मुंबई (महाराष्ट्र)
१ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी 'स्वच्छ शहर पुरस्कार'
-
कराड (महाराष्ट्र)
-
सासवड (महाराष्ट्र)
-
लोणावळा (महाराष्ट्र)
१०० पेक्षा अधिक शहरे असलेले सर्वात स्वच्छ राज्य
-
छत्तीसगड
१०० पेक्षा कमी शहरे असलेले सर्वात स्वच्छ राज्य
-
झारखंड
सर्वात स्वच्छ गंगा शहर
-
वाराणसी (उत्तर प्रदेश)
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग असणारे ठिकाण
-
शाहजहांपूर (उत्तर प्रदेश)
४० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली सर्वात स्वच्छ मेगासिटी
-
अहमदाबाद (गुजरात)
४० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली सर्वोत्कृष्ट आत्म-शाश्वत शहरे
-
बेंगलुरू (कर्नाटक)
-
विजयवाडा (आंध्र प्रदेश)
स्वच्छतेच्या दृष्टीने जलद गतीने वृद्धी करणारे शहर
-
जोधपूर (राजस्थान)
स्वच्छतेच्या बाबतीत आत्म-शाश्वत शहर (१० लाखाहून अधिक लोकसंख्या)
-
राजकोट (गुजरात)
स्वच्छतेच्या बाबतीत आत्म-शाश्वत शहर (१० लाखाहून कमी लोकसंख्या)
-
म्हैसूर (कर्नाटक)
सर्वात स्वच्छ लहान शहरे
-
अंबिकापूर (छत्तीसगड)
-
बुरहानपुर (मध्य प्रदेश)
१ लाख ते ३ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेले सर्वात स्वच्छ शहर
-
तिरुपती (आंध्र प्रदेश)
सर्वात स्वच्छ राजधानी
-
नवी दिल्ली (केंद्रशासित प्रदेश नवी दिल्ली) आणि एनडीएमसी.
सर्वात जलदगत्या गतिमान होणारी स्वच्छ राजधानी
-
लखनऊ (उत्तर प्रदेश)
सर्वात वेगवान गतिशील आत्म-शाश्वत स्वच्छ राजधानी
-
भोपाळ (मध्य प्रदेश)
उत्तर विभागातील सर्वात स्वच्छ शहर
-
गंगाघाट (उत्तर प्रदेश)
उत्तर विभागातील सर्वात स्वच्छ शहर (लोकसंख्या २५००० ते ५००००)
-
नवाशहर (पंजाब)
उत्तर विभागातील सर्वात स्वच्छ शहर (लोकसंख्या २५००० पेक्षा कमी)
-
अवघार (उत्तर प्रदेश)
ईशान्य विभागातील सर्वात स्वच्छ शहर
-
जोरहाट (आसाम)
ईशान्य विभागातील सर्वात स्वच्छ शहर (लोकसंख्या २५००० ते ५००००)
-
मोकुकचंग (नागालँड)
ईशान्य विभागातील सर्वात स्वच्छ शहर (लोकसंख्या २५००० पेक्षा कमी)
-
जिरीबाम (मणिपूर)
पूर्व विभागातील सर्वात स्वच्छ शहरे
-
धमतरी (ओडिशा)
-
जशपूर नगर (छत्तीसगड)
-
पाटण (गुजरात)
दक्षिण विभागातील सर्वात स्वच्छ शहरे
-
पालामेनेरू (आंध्र प्रदेश)
-
मेदचल (तेलंगणा)
-
पेरियापटना (कर्नाटक)
पश्चिम विभागातील सर्वात स्वच्छ शहरे
-
रत्नागिरी (महाराष्ट्र)
-
शिर्डी (महाराष्ट्र)
-
पन्हाळा (महाराष्ट्र)
देशातील सर्वात स्वच्छ छावण्या
-
जालंधर छावणी
-
दिल्ली छावणी
-
मेरठ छावणी
स्वच्छतेच्या बाबतीत नागरिक सहभाग जनजागृतीसाठी पुरस्कार मिळवणारी शहरे
-
उज्जैन (मध्य प्रदेश)
-
करीमनगर (तेलंगणा)
-
सिहोरा (मध्य प्रदेश)
१०० हून अधिक शहरांसह उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य
-
महाराष्ट्र
१०० पेक्षा कमी शहरांसह उत्कृष्ट प्रदर्शन करणारे राज्य
-
मध्य प्रदेश