• ICC मार्फत दशकातील प्रतिष्ठीत पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ICC च्या या विशेष पुरास्काराने गेल्या १० वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गौरविण्यात येते.

विजेत्यांची यादी

  • ICC दशकातील स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार (ICC Spirit of Cricket Award of the Decade): महेंद्रसिंग धोनी (भारत)

ICC पुरुष पुरस्कार

  • सर गारफिल्ड सोबर्स ICC दशकातील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार (Sir Garfield Sobers Award for ICC Male Cricketer of the Decade): विराट कोहली (भारत)

  • ICC दशकातील पुरूष एकदिवसीय क्रिकेटपटू (ICC Men’s ODI Cricketer of the Decade): विराट कोहली (भारत)

  • ICC आंतरराष्ट्रीय पुरुष टी - २० सर्वोत्कृष्ट खेळाडू (ICC Men’s T20I Cricketer of the Decade): राशीद खान (अफगाणिस्तान)

  • ICC दशकातील सर्वोत्कृष्ट पुरुष कसोटीपटू (ICC Men’s Test Cricketer of the Decade): स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

  • ICC दशकातील पुरुष सहयोगी क्रिकेटपटू (ICC Men’s Associate Cricketer of the Decade): काइल कोएत्झर (स्कॉटलंड)

ICC महिला पुरस्कार

  • ICC दशकातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसाठीचा रॅचेल हेहो फ्लिंट पुरस्कार (Rachael Heyhoe Flint Award for ICC Female Cricketer of the Decade): एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया)

  • ICC दशकातील सर्वोत्कृष्ट महिला एकदिवसीय क्रिकेटपटू (ICC Women’s ODI Cricketer of the Decade): एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया)

  • ICC आंतरराष्ट्रीय महिला टी - २० सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू (ICC Women’s T20I Cricketer of the Decade): एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया)

  • ICC दशकातील महिला सहयोगी क्रिकेटपटू (ICC Women’s Associate Cricketer of the Decade): कॅथ्रीन ब्रिस (स्कॉटलंड)

ICC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.

  • स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे चेअरमन: इम्रान ख्वाजा (अंतरिम) हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.

  • सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.

  • सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.

  • ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.