-
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमद्वारे (United Nations Environment Programme - UNEP) संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान असणाऱ्या 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार (Champions of the Earth Award) २०२०' श्रेणीतील ६ पुरस्कार विजेते जाहीर करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
संपूर्ण ग्रह आणि लोकांच्या कल्याणासाठी धाडसी आणि निर्णायक कृतीतून चांगला परिणाम घडवणाऱ्या तसेच उल्लेखनीय नेतृत्त्व दर्शवणाऱ्या चॅम्पियन्सची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराच्या ५ श्रेणी
-
धोरण नेतृत्व (Policy Leadership) पुरस्कार
-
प्रेरणा आणि क्रिया (Inspiration and Action) पुरस्कार
-
विज्ञान आणि नाविन्य (Science and Innovation) पुरस्कार
-
उद्योजक दृष्टी (Entrepreneur Vision) पुरस्कार
-
जीवनगौरव (Lifetime Achievement) पुरस्कार
पुरस्कार विजेत्यांची यादी
धोरण नेतृत्व (Policy Leadership) पुरस्कार
-
फ्रँक बाणीमारमा (पंतप्रधान, फिजी) याना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
जागतिक पातळीवरील हवामान कृती कार्य तसेच हवामान-उत्तरदायी राष्ट्रीय विकासाबाबतच्या वचनबद्धतेबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
प्रेरणा आणि क्रिया (Inspiration and Action) पुरस्कार
-
याकोबा सावडोगो (बुर्किना फासो) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
मातीचे पुनर्जनन व नापीक जमीन शेतीयोग्य करणे तसेच आफ्रिकेच्या जंगलात पारंपारिक निसर्गाधारित उपाय इ.बद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रेरणा आणि क्रिया (Inspiration and Action) पुरस्कार
-
नेमोंटे नेनक्विमो (इक्वाडोर) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विज्ञान आणि नाविन्य (Science and Innovation) पुरस्कार
-
डॉ. फॅबियन लेन्डरत्झ (जर्मनी) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
झुनोटिकमधील शोध तसेच 'वन हेल्थ'मधील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
उद्योजक दृष्टी (Entrepreneur Vision) पुरस्कार
-
मिंडी ल्यूबर (यूएसए) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
गुंतवणूकदार आणि कंपन्यांना एकत्रित करून हवामानातील कृती आणि शाश्वतता यासाठी भांडवल बाजारपेठेला हरित करण्याच्या प्रतिबद्धतेबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जीवनगौरव (Lifetime Achievement) पुरस्कार
-
प्रो. रॉबर्ट डी. बुलार्ड (यूएसए) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
पर्यावरणविषयक न्यायाची वचनबद्धता तसेच सेवा दिल्याबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती
-
पुरस्कार सुरुवात: संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमद्वारे (UNEP) २००५ पासून सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
-
पुरस्कार उद्देश: लोकांना निसर्गासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.
-
पुरस्कार वैशिष्ट्य: नैसर्गिक आणि मानवनिर्मित धोक्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन ग्रहांचे आरोग्य सुधारण्यासाठी पुढाकार घेणार्या सार्वजनिक, खासगी क्षेत्रातील तसेच समाजातील पर्यावरण नेत्यांना सदर पुरस्कार देण्यात येतो.