-
अल्फ्रेड अहो यांना २०२० सालाचा 'एसीएम ट्युरिंग पुरस्कार (ACM Turing Award)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
अल्फ्रेड व्ही. अहो यांनी २०२० सालाचा 'असोसिएशन फॉर कम्प्यूटिंग मशनरी (Association for Computing Machinery - ACM) ए.एम. ट्युरिंग पुरस्कार' हा 'संगणनाचा नोबेल पुरस्कार (Nobel Prize of computing)' म्हणून अनौपचारिकरित्या ओळखला जाणारा पुरस्कार जिंकला आहे.
-
अहो यांनी त्यांचे दीर्घकाळचे सहयोगी असणाऱ्या जेफ्री डेव्हिड उलमन यांच्यासह सदर पुरस्कार सामायिकरित्या स्वीकारला आहे.