• राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत (National Statistical Office - NSO) २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाहीच्या (जुलै-सप्टेंबर) सकल देशांतर्गत उत्पादनाचे (Gross Domestic Product - GDP) अंदाज जाहीर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे

  • २०११-१२ च्या स्थिर किंमतींच्या अनुषंगाने २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाहीचा GDP ३३.१४ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • २०१९-२०२० च्या दुसऱ्या तिमाहीचा अंदाजित GDP ३५.८४ लाख कोटी रुपये इतका होता.

  • सदर आकडेवारीनुसार यामध्ये ७.५% इतकी घट झाली आहे.