-
तिसरा जागतिक सांख्यिकी दिन (World Statistics Day) २० ऑक्टोबर २०२० रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे
-
जागतिक सांख्यिकी दिवस २०२० साजरा करणे हा जागतिक प्रयत्न असून त्याचे आयोजन कार्य संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाच्या (United Nations Statistical Commission) मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
-
'आपण विश्वास ठेवू शकत असणाऱ्या माहितीसह जगाला जोडणे (Connecting the world with data we can trust)' या थीमअंतर्गत २०२० सालचा जागतिक सांख्यिकी दिन साजरा करण्यात येत आहे.
-
सदर थीममार्फत विश्वास, नाविन्य आणि राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालींमध्ये लोकांचे महत्त्व यांना प्रतिबिंबित करण्याचे उपयुक्त कार्य करण्यात येत आहे.
-
संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगामार्फत फेब्रुवारी २०१० मध्ये २० ऑक्टोबरला जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.