• दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी 'जागतिक बालदिन (World Children’s Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • आंतरराष्ट्रीय एकता वाढविणे, मुलांमध्ये जागरूकता वाढविणे आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना राबविणे या उद्देशांसाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • २० नोव्हेंबर १९५९ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेमार्फत बाल हक्कांच्या घोषणेचा स्वीकार करण्यात आला होता. त्या दिवसाच्या सन्मानार्थ २० नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जातो.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.