• दरवर्षी २० मार्च रोजी 'आंतरराष्ट्रीय आनंद दिन (International Day of Happiness)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगभरातील सर्व मानवांसाठी मूलभूत मानवाधिकार म्हणून आनंदाला चालना देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • ‘शांत रहा. शहाणे रहा. दयाळू बना (Keep Calm. Stay Wise. Be Kind)' ही २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय आनंद दिन अभियानाची थीम आहे.

  • २०१३ पासून जगभरातील लोकांच्या जीवनात आनंदाचे महत्त्व ओळखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमार्फत आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा केला जातो.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.