• 'जागतिक सामाजिक न्याय दिन (World Day of Social Justice)' दरवर्षी २० फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेमार्फत (International Labour Organization - ILO) १० जून २००८ रोजी सामाजिक न्याय विषयक ILO घोषणा एकमताने स्विकारण्यात आली होती.

  • 'डिजीटल अर्थव्यवस्थेमधील सामाजिक न्यायासाठी हाक (A Call for Social Justice in the Digital Economy)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक सामाजिक न्याय दिनाची थीम आहे.

ILO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ILO म्हणजेच International Labour Organization अर्थात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे ILO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: ११ एप्रिल १९१९ रोजी ILO ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्य महासंचालक: गाय रायडर हे सध्या मुख्य महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

  • संस्थेचा प्रकार: संयुक्त राष्ट्रांची विशेष एजन्सी या स्वरूपात ILO सध्या कार्यरत आहे.

  • सदस्यत्व: ILO चे सध्या १८७ सदस्य देश आहेत.