-
भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २० ऑगस्ट रोजी 'सद्भावना दिवस (Sadbhavana Diwas)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
यंदा २०२१ साली राजीव गांधी यांची ७७ वी जयंती साजरी करण्यात येत आहे.
-
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमार्फत १९९२ मध्ये 'राजीव गांधी सद्भावना पुरस्कार' स्थापन करण्यात आला होता.
राजीव गांधी यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती
-
ते वयाच्या ४० व्या वर्षी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून विराजमान झाले होते.
-
१९८४-८९ या कालावधीत त्यांनी देशाची सेवा केली होती.
-
शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांनी १९८६ मध्ये 'राष्ट्रीय शिक्षण धोरण (National Education Policy)' आणले होते.
-
६ वी ते १२ पर्यंत ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षण प्रदान करण्यासाठी त्यांनी 'जवाहर नवोदय विद्यालय' प्रणालीची स्थापना केली होती.