• आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते, अहिंसेच्या तत्वज्ञानाचे मार्गदर्शक असणाऱ्या महात्मा गांधी यांचा २ ऑक्टोबर हा जन्मदिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day of Non-Violence)' म्हणून साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा शिक्षणाद्वारे जनजागृतीतून अहिंसेचा संदेश प्रसारित करण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात येतो.

  • भारतातील या दिवसाला गांधी जयंती म्हणून संबोधले जाते.

  • १५ जून २००७ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत २ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून स्थापित करण्यासाठी मतदान घेण्यात आले होते.

  • २०२० सालची ही गांधीजींची १५१ वी जयंती आहे.

  • 'शांतीला एकत्रितपणे आकार देणे (Shaping Peace Together)' ही सदर दिवसाची २०२० सालासाठीची थीम आहे.