• 'जागतिक पाणथळ दिवस (World Wetlands Day)' दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • लोक तसेच आपल्या ग्रहासाठीच्या पाणथळ भूमीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी जनजागृती करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'पाणथळ क्षेत्र आणि पाणी (Wetlands and Water)' ही जागतिक पाणथळ दिवस २०२१ ची आंतरराष्ट्रीय थीम आहे.

  • कॅस्परियन समुद्र किनाऱ्यावरील इराणी शहर रामसर येथे २ फेब्रुवारी १९७१ रोजी पाणथळ क्षेत्राबाबतचा करार स्वीकारण्याच्या तारखेला सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • यंदा म्हणजेच २०२१ मध्ये पाणथळ क्षेत्राबाबतच्या कराराला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

  • १९९७ मध्ये जागतिक पाणथळ दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.