• भारतात दरवर्षी २ डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन (National Pollution Control Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • १९८४ सालामध्ये २-३ डिसेंबरच्या रात्री झालेल्या भोपाळच्या दुर्दैवी वायू दुर्घटनेच्या मृत्यू पावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • यंदाचा २०२० सालचा भोपाळ वायू दुर्घटनेचा ३६ वा वर्धापन दिन आहे.

  • हवा, पाणी आणि मातीच्या वाढत्या प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्यात येऊन प्रदूषण नियंत्रण कायद्यांविषयी लोकांचे लक्ष वेधण्याचे कार्य सदर दिवसाद्वारे पार पाडले जाते.