-
संयुक्त राष्ट्र आमसभेच्या वतीने १९८६ पासून दरवर्षी २ डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन (International Day for the Abolition of Slavery)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
मानवी तस्करी, लैंगिक शोषण, बालमजुरी, सक्तीचे लग्न यांसारख्या गुलामीच्या प्रकारांचे समूळ उच्चाटन करणे हे सदर दिवसाचे मुख्य लक्ष आहे.
-
सशस्त्र संघर्षमय स्थितींमध्ये मुलांची सक्तीने भरती करणे यासारखे अमानुष प्रकार थांबवणे हे या दिवसाचे ध्येय आहे.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.