-
शहरी भागात 'सामुदायिक वन संसाधन हक्कांना (Community Forest Resource Rights)' मान्यता देणारे छत्तीसगड हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
ठळक मुद्दे
-
राज्य सरकारतर्फे धमतरी जिल्ह्यातील रहिवाशांच्या ४१२७ हेक्टर क्षेत्रावरील जंगल अधिकारांची दखल घेण्यात आली आहे.
छत्तीसगड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: भूपेश बाघेल हे सध्या छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: अनुसूया उईके या सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड राज्याची स्थापना करण्यात आली होती.
-
राजधानी शहर: नवा रायपूर हे छत्तीसगडच्या राजधानीचे शहर आहे.