• दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन' जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २०२० हे संयुक्त राष्ट्रांचे ७५ वे तसेच आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिनाचे ३० वे वर्धापन वर्ष आहे.

  • सदर दिवस हा आजच्या जगात वृद्ध व्यक्तींनी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकण्याची आणि वृद्धत्वाच्या संधी आणि आव्हानांबद्दल जागरूकता वाढविण्याची क्रिया पार पाडतो.

  • 'साथीचे रोग: वय आणि वृद्धापकाळाला आपण कसे संबोधतो हे ते बदलतात का? (Pandemics: Do They Change How We Address Age and Ageing?)' ही आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन २०२० ची थीम आहे.

  • १४ डिसेंबर १९९० रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत (United Nations General Assembly) १ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ व्यक्ती दिन म्हणून निश्चित करण्यात आले होते.

संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.