• केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यामार्फत केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील विझिंजाम गावामध्ये प्रतीक्षा (PRATHEEKSHA) नावाची पहिली सागरी रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • अनावरण करण्यात आलेल्या इतर सागरी रूग्णवाहिकांमध्ये प्रत्यशा (Pratyasha) आणि करुण्या (Karunya) यांचा समावेश करण्यात आला आहे.

  • एर्नाकुलममध्ये प्रत्यशा तर कोझिकोडमध्ये करुण्या तैनात करण्यात येणार आहे.

केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्याचा दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.